नमस्कार मित्रहो,
आपण आज
२०२२ च्या
उंबरठ्यावर पोहोचलो
आहोत. तसे २०२०
आणि २०२१
बद्दल काय
बोलावे. दोन्ही
वर्ष कोरोनाच्या
विळख्यात गेली.
२०१९ साली
जन्मलेल्या कोरोनाने
२०२० साली
संपूर्ण जगाला
विळखा घातला.
त्या विळख्यातच
२०२१ सलात
आपण पोहोचलो.
वर्षाच्या सुरवातीला
कोरोनावर लस
सापडली. म्हटलं
आता सुटलो.
पण पुन्हा
लॉकडाऊन लागला.
आता वर्षाच्या
सरते क्षणी
सगळे कोरोनाला
सरसावले तर
त्याची नवनवीन
पिल्लं येताहेत.
असं वाटत
हि दोन्ही
वर्ष अंतरिक्षात
जाऊन त्या
ब्लॅक होल
मध्ये सोडून
द्यावीत. तरी
२०२१ ने
काही चांगले
ही दिले.
वर्षाच्या
सुरवातीला झाला
माझ्या बकेट
लिस्ट मधील
एक ट्रेक
AMK.
अजिंक्य
हायकर्स च्या
अनुभवी सोबत्यां
बरोबर AMK म्हणजेच
अलंग, मदन,
कुलंग हे
तीन किल्ले
जे सर्व
ट्रेकर्स चे
स्वप्न असते
ते पूर्ण
झाले. नाशिक
ला जाता
येताना दुरून
खुणावणारे, कळसुबाई
च्या शिखरावरून
अगदी जवळून
न्याहाळलेले AMK . विस्तीर्ण पसरलेला
अलंग, सरळ
आकाशात शिरलेला
मदन आणि
सुंदर मनमोहक
कुलंग. तीनही
किल्ले दुर्गम.
सुंदर कातळात कोरलेल्या
पायऱ्या परंतु
सुरुंग लावून
फोडल्यामुळे कठीण
श्रेणीत जाऊन
बसलेले. निसरड्या
वाटा, घनदाट
जंगल परंतु
अतिशय देखणे.
तटबंदी, दरवाजे,
गुहा, पाण्याच्या
टाक्या, भग्न
अवशेष आणि
बरेच काही.
वर्षाच्या
शेवटी प्रथमच
नर्मदा मातेला
भेटण्याचा योग्य
आला. एक
छोटी परिक्रमा
झाली. परिक्रमार्थींच्या
भेटी झाल्या.
पवित्र नर्मदेत
डुबकी मारली
आणि जन्मच
सार्थक झालं.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
, मंडलेश्वर, महेश्वर
किल्ला, अतिशय
सुंदर व
विस्तीर्ण असे
नर्मदेचे घाट,
महेश्वर किल्ल्यातील
अहिल्याबाई होळकरांचा
वाडा, भव्यदिव्य
आणि कलाकुसर
असलेली मंदिरे
पहिली. आणि
ज्या साठी
आसुसलो होतो
ते रावळखेडी
असलेली बाजीराव
पेशवे यांची
समाधी. त्यांच्या
लढाया, शौर्य,
इतिहास सारे
काही अद्भुत.
२०२२ खूप
आशादायी, सुंदर,
छान असे
जाणार ह्यात
शंकाच नाही.
हे येणारं वर्ष
मागील दोन
वर्षाची सर्व
कमतरता भरून
काढेल इतकं सगळं
चांगलं देणार
आहे.
शेवटी म्हणतात
ना ......
आशाएँ…आशाएँ…आशाएँ…
कुछ पाने की हो आस आस
कुछ अरमाँ हो जो ख़ास ख़ास
आशाएँ…. आशाएँ…. आशाएँ….
हर कोशिश में हो वार वार
करे दरियाओं को आर पार
आशाएँ…आशाएँ…आशाएँ…
तूफानों को चीर के
मंज़िलों को छीन ले
आशाएँ खिले दिल की
उम्मीदें हँसे दिल की
अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी !!
नवीन वर्षाच्या तुम्हां सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment